
पळासदडेचे सुपुत्र प्रवीण नाना पाटील यांची केंद्रप्रमुख पदासाठी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदडे गावचे सुपुत्र तथा पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रवीण नाना पाटील यांनी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रप्रमुख पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे पळासदडे गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवीण पाटील यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पळासदडे विचार क्रांती युवा मंच तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील शैक्षणिक व प्रशासकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रवीण पाटील यांचे हे यश गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply