शाळा, महाविद्यालयांसह अमळनेरमध्ये मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा

भव्य शोभायात्रा, पथनाट्ये आणि रक्तदान शिबिराने उत्सवाची शोभा वाढवली

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तर पथनाट्ये आणि रक्तदान शिबिराने उत्सवाची शोभा वाढवली.

उत्सवाच्या प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांत अधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते आणि पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती पार पडली. यावेळी जीत स्टुडिओ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. बोहरा स्कूलचे पथनाट्य तसेच न्यू व्हिजन आणि कन्हैया ग्रुप (रुबजीनगर) यांच्या लाठी-काठीच्या कर्तबगारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मिरवणूक मार्गावर विजय पाटील (पाटील बिल्डर्स), राज लाड (बिल्डर), आकाश परदेशी, भूषण चौधरी, तुषार बाविस्कर तसेच बालवीर व्यायामशाळा यांच्या वतीने थंड पेय, शरबत, लस्सी आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उत्सवासाठी माजी आमदार शिरीष दादा चौधरी, डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, अमेय मुंदडा, सरजू शेठ गोकलानी , विकी आबा जाधव, भरत लालवाणी, डॉ. अनिल शिंदे, दादा पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. नाट्यमंदिर येथे सामूहिक आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी माजी आमदार शिरीष दादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती दादा पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, मोहन सातपुते, सुरज परदेशी, पंकज भोई, नाना धनगर, ॲड. दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करून सार्वजनिक शिवजयंतीचा समारोप केला. आयोजकांच्या वतीने सहभागी झालेल्या सर्व शाळकरी मुलामुलींना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मंगळ ग्रह संस्था यांच्या सहकार्याने दरवर्षी केला जातो. संपूर्ण मिरवणुकीत अथर्व जाधव, मोहित पाटील, रितेश सैंदाणे, प्रेम पाटील, यश हापसे, राज पाटील (ड्रोन) तसेच खेमचंद सूर्यवंशी (जेपी) यांनी फोटो व ड्रोन व्हिडिओ शूट करून मोलाचे योगदान दिले. सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या युवा मित्र परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हजारो रुग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या या युवा मित्र परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

जी. एस. हायस्कूल

 

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षक ए. ए. पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याचा इतिहास आपल्या मनोगतातून उलगडला. या वेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस. आर. शिंगाने, सी. एस. सोनजे, खानदेश शिक्षण मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, ज्येष्ठ लिपीक जयश्री भालेराव, आर. जे. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.  सूत्रसंचालन विद्यार्थी संघाचे प्रमुख डी. एम. निघोट यांनी केले. आभार हर्षल चौधरी यांनी मानले.

 

श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल

 

अमळनेर येतील श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल येथे आज शिवजयंतीचे औचित्य साधून जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण जीवनपट देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला. कार्यक्रमात शिवजन्म, राजमाता जिजाऊंची शिवबाला दिलेली संस्कारमय शिकवण, रायरेश्वर येथे स्वराज्याची घेतलेली शपथ, ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे’ ही महाराजांची ध्येयदृष्टी, स्त्री-सन्मानाचा तेजस्वी आदर्श, धर्म-जातीपलीकडे सर्वांना एकत्र बांधणारा लोककल्याणकारी राजा, मावळ्यांसह लढणाऱ्या मराठा वीरांची शौर्यगाथा तसेच भव्य शिवराज्याभिषेक अशा प्रसंगांचे सजीव सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयकौशल्याने आणि नेपथ्याच्या प्रभावी मांडणीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती, शौर्य व सामाजिक समतेचे संस्कार रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पालक, शिक्षक व मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

 

धनदाई महाविद्यालयात व्याख्यान

 

अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समताधिष्ठित राज्यव्यवस्थेचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला. प्रमुख वक्ते जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथील प्रा. डॉ. विलास पाटील यांनी शिवराज्याच्या तत्त्वज्ञानाचे आधुनिक संदर्भात महत्त्व स्पष्ट करताना शिवविचार समाजाला एकत्र आणणारे असल्याचे सांगितले. “शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी होते. स्त्रीसन्मान, सामाजिक समता आणि न्याय ही त्यांच्या राज्यकारभाराची मूलतत्त्वे होती,” असे ते म्हणाले. जातिभेदमुक्त समाजरचनेचे उदाहरण म्हणून त्यांनी शिवकालीन प्रशासनाचा उल्लेख केला. ‘मराठा’ ही व्यापक सांस्कृतिक संकल्पना असून ती समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्राचा अभ्यास शास्त्रीय व तर्कसंगत दृष्टिकोनातून होणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून समन्यायी राज्यकारभाराची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. बारा बलुतेदारांच्या सहभागातून उभारलेले स्वराज्य हे लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर पाटील यांनी केले. तर प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.

 

पंतजली महिला योग समिती

 

अमळनेर येथील पंतजली महिला योग समितीतर्फे शिवजयंती निमित्त पहाटे ६ वाजता सर्व योग वर्ग क्रांतीपर्व स्मारक ढेकू रोड अमळनेर येथून प्रभात फेरी काढण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिवाजी महाराज व योग संदर्भात घोषणा योग शिक्षक व योग साधक यांनी घोषणा दिल्या. ढेकूरोड वरून जिजाऊ प्रवेशद्वार जवळ मराठा सेवा संघ यांच्या नियोजित गीत गायन कार्यक्रम झाला. त्यात महिला पतंजली योग समिती अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार व पंतजलीचे अधिकारी प्रा.उषा पवार यांच्या हस्ते आई जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्टेशन रोड मार्गे प्रभातफेरी नाट्यगृह जवळ शिवरायांचे पूजन करण्यात आले. कामिनी पवार व रूपाली पवार यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार व रत्ना भदाणे यांनी केले. कार्यक्रमायशस्वितेसाठी सर्व योग शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

 

मारवड महाविद्यालय

 

अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाचे कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून  पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. याप्रसंगी प्रा.डॉ. दिलीप कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यांच्या शौर्याने इतिहास घडला ज्यांच्या नेतृत्वाने स्वराज्य उभे राहिलं. असे रयतेच्या राजाला सर्वांनी त्रिवार मानाचा मुजरा केला.  त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श प्रत्येक मराठी मनात सदैव जिवंत राहील, असे सांगितले. या वेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रविन्द्र सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

​याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे गडकिल्ल्यांचे व्यवस्थापन, शिस्त आणि रयतेच्या कल्याणाचा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

​या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे  प्रा.अनिल बोरसे, प्रा.देवेश भावसार, प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. प्रियंका महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. मानसी उपासनी, प्रा. वैशाली कुलकर्णी व श्री.ज्ञानेश्वर चौधरी,श्री. अनिल महाजन, श्री.जितेंद्र पाटील, श्री. पंकज पवार , श्री. महेश सोनजे, श्री. प्रशांत चौधरी, श्री.प्रकाश पाटील, श्री.कैलास कड, श्री.किशोर बुलके व श्री यश शिंपी कार्यक्रमास उपस्थित होते.

 

अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर : शहरातील मानाचा शिवजन्मोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते व पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांनी आकर्षक देखावे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. जीत स्टुडिओचे सादरीकरण विशेष ठरले. बोहरा स्कूलचे पथनाट्य, न्यू व्हिजन व कन्हैया ग्रुप (रुबजीनगर) यांच्या लाठी-काठीच्या कर्तबगारीने मिरवणुकीत रंगत आणली.

मिरवणूक मार्गावर विजय पाटील (पाटील बिल्डर्स), राज लाड (बिल्डर), आकाश परदेशी, भूषण चौधरी, तुषार बाविस्कर तसेच बालवीर व्यायामशाळा यांच्या वतीने थंड पेय, शरबत, लस्सी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

या उत्सवासाठी मा. आ. शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, अमेय मुंदडा, सरजू शेठ, विकी आबा जाधव, भरत लालवाणी, डॉ. अनिल शिंदे, दादा पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.

नाट्य मंदिर येथे सामूहिक आरतीने उत्सवाचा समारोप झाला. मा. आ. शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती दादा पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास l पाटील, मोहन सातपुते, सुरज परदेशी, पंकज भोई, नाना धनगर, अॅड. दिनेश पाटील आदी मान्यवरांनी आरतीत सहभाग घेतला. सहभागी शाळकरी मुलामुलींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. मंगळग्रह संस्थेच्या सहकार्यामुळे हा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला.

संपूर्ण मिरवणुकीत अथर्व जाधव, मोहित पाटील, रितेश सैंदाणे, प्रेम पाटील, यश हापसे, राज पाटील (ड्रोन) तसेच खेमचंद सूर्यवंशी (जेपी) यांनी फोटोशूट व ड्रोन व्हिडीओ रील्स तयार करून मोलाचे योगदान दिले. तर रणजित शिंदे यांच्या कडून मुलगा शिवतेज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमी साठी शिवभोजनाची सेवा प्रदान करण्यात आली.सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

दरम्यान, समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या युवा मित्र परिवाराने शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हजारो रुग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या या परिवाराच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

एकूणच, अमळनेरकरांनी एकोप्याने व उत्साहात साजरा केलेला शिवजन्मोत्सव सामाजिक ऐक्य आणि शिवविचारांचा संदेश देणारा ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *