अमळनेरमध्ये साठे बिल्डिंगसह आर. के. फॅक्टरीच्या आवारात आग

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दोन घटना घडल्या. ८ नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई चौकातील जुनी साठे बिल्डिंग येथे आग लागली, तर ९ नोव्हेंबर रोजी आर. के. पटेल कारखान्याच्या मोकळ्या मैदानात आग लागली. दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी राणी लक्ष्मीबाई चौकातील जुनी साठे बिल्डिंग येथे आग लागल्याची माहिती नगरसेवक पंकज चौधरी यांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे विझवली. या कामात कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्यने संदानशिव आणि विजय भोई यांनी सहकार्य केले. दिवाळीतील फटाक्यांमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इमारत जुनी असल्याने छतावर वाढलेले गवत वाळले होते. त्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आर. के. पटेल कारखान्याच्या मोकळ्या मैदानात अचानक आग लागली. फॅक्टरीचे मालक विनोद पाटील आणि बिपीन पाटील यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, रफीक पठाण, मच्छीन्द्र चौधरी, भिका संदानशीव आणि आकाश बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. दिवसा आग लागल्याने ती वेळीच निदर्शनास आली. मात्र, ही घटना रात्री घडली असती तर शेजारील पेट्रोलपंपालाही आगीचा धोका निर्माण झाला असता. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *