
अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधरा लांडगे
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँक लि.च्या अध्यक्षपदी अभिषेक (मोना) विनोद पाटील, तर उपाध्यक्षपदी वसुंधरा दशरथ लांडगे यांची सोमवारी बँकेच्या सभागृहात बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
मावळते अध्यक्ष भरतकुमार सुरेश ललवाणी व उपाध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग महाजन यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून ठरल्याप्रमाणे राजीनामे दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. निवडणूक अधिकारी व्ही. एम. जगताप व सहाय्यक सुनील महाजन यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर संचालक मंडळातर्फे मावळते अध्यक्ष भरतकुमार सुरेश ललवाणी व उपाध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग महाजन यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बँकेचे संचालक प्रवीण रामलाल जैन, पंकज गोविंद मुंदडे, प्रदीपकुमार कुंदनलाल अग्रवाल, दीपक छबुलाल साळी, प्रवीण श्रीराम पाटील, पंडित रामचंद्र चौधरी, रणजित भास्कर शिंदे, मोहन बाळाजी सातपुते, डॉ. मनिषा विवेकानंद लाठी, अॅड. विनायक राजाराम पाटील, अॅड. विजय जगन्नाथ बोरसे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत रामभाऊ पाटील उपस्थित होते. नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नेतृत्वामुळे बँकेच्या कारभाराला अधिक गतिमान दिशा मिळण्याची अपेक्षा सभासद व खातेदारांकडून व्यक्त होत आहे.
सभासद व बँक हिताला प्राधान्याची ग्वाही
निवडीनंतर नूतन अध्यक्ष अभिषेक (मोना) विनोद पाटील व उपाध्यक्षा वसुंधरा दशरथ लांडगे यांनी आभार मानले. अर्बन बँकेच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार, खातेदार व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्याबरोबरच बँकेच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू, असा मानस त्यांनी व्यक्त केला. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply