आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर व जयनिल फाऊंडेशनतर्फे राष्ट्रप्रेमाचा संदेश देत ध्वजारोहण उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.

देवगाव-देवळी (ता. अमळनेर) येथील आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. बेस कॅम्प येथे सकाळी ८ वाजता आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुष्पाबाई भाईदास पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाचा गौरवशाली सोहळा साजरा केला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील, हिंगोणे येथील लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांच्यासह जयनिल फाऊंडेशनचे सदस्य, आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल दादा भाईदास पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याचा संदेश दिला.

देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प करत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करत देशसेवेची भावना अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *