महावीर युवा परिषद संचलित गौशाळेत आज बैलपोळा उत्सव; नंदी पूजनाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील महावीर युवा परिषद संचलित मुंबई निवासी कांतीलाल लल्लुभाई झवेरी अमळनेर गौशाळा (पांजरापोळ)तर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही बैलपोळा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गौशाळेतील ‘नंदी’ पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा पूजन कार्यक्रम महावीर पेन्टस्, न्यू प्लॉट, अमळनेर येथे होणार आहे. या प्रसंगी सर्व गौप्रेमींनी मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महावीर युवा परिषद संचलित श्रीमान कांतीलाल लल्लुभाई झवेरी अमळनेर गौशाळेचे सेक्रेटरी प्रकाश रतनलाल छाजेड, अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण बी. कोचर आणि समस्त ट्रस्टी गण यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *