
अमळनेरमध्ये मोकाट कुत्र्याचा बालकावर हल्ला; गंभीर जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. काल रात्री जुने बस स्टँड परिसरात ९ वर्षीय बालकावर कुत्र्याने भीषण हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अविनाश कैलास पांचाळ असे जखमी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश हा जुने बस स्टँड परिसरात असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घालत जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Leave a Reply