फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका; रोल-प्लेमधून गुरूजनांना अनोखी मानवंदना

अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत संपूर्ण दिवसाचे शैक्षणिक कामकाज अत्यंत जबाबदारीने सांभाळले.

विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ आणि प्रभारी प्राचार्य प्रा. प्रितम पाटील यांनी केले. त्यानंतर अंतिम वर्षाचा विद्यार्थी तन्मय राकेश पाटील याने प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेत दिवसाचे नियोजन केले. गीता पाटील, मयुरी पाटील, प्रियंका सैंदाणे, तन्मय पाटील, श्वेता पाटील, श्रावणी महाजन, शीतल पाटील, साक्षी पाटील आणि उदय पाटील या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांची भूमिका साकारत वर्ग नियंत्रणासोबत तासिकांचे कामकाज पाहिले. शिक्षकांच्या भूमिकेत वावरताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जबाबदाऱ्यांचा अनुभव घेतला.

फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे, समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या साक्षी पाटील, गीता पाटील, प्रियंका सैंदाणे आणि रोशनी महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डिप्लोमा अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कल्याणी पाटील हिने आभार मानले.

 

भाषणातून शिक्षकांप्रति कृतज्ञता

 

द्वितीय वर्ष बी. फार्मच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षकांप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त केली. अदिती गोहोर, भाग्यश्री मंडोले, चैताली बोरसे, लक्ष्मी महाजन आणि मोहन पाटील यांनी शिक्षकांचे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षकांचे महत्त्व यावर प्रभावी विचार मांडले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *