शिरूड येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरूड येथून १६ वर्षे वयाच्या मुलीला १६ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीचे आई-वडील कामानिमित्त भाकुर्ली, जिल्हा बडवाणी, मध्यप्रदेश येथून शिरूड येथे येऊन वास्तव्यास होते. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *