वावडे येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील वावडे येथे एका २१ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वावडे येथील मुकेश लक्ष्मण पाटील (वय २१) याने घराच्या छतावरील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आपले जीवन संपविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरविले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच मारवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

या घटनेमुळे वावडे परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *