नंदगावच्या श्रीराम मंदिर भक्तीधामात गणेश-लक्ष्मी महायज्ञाचा भक्तिमय सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) नंदगाव येथील श्रीराम मंदिर भक्तीधाम तीर्थक्षेत्री गणेशोत्सव आणि राधाष्टमी उत्सवानिमित्त श्री गणेश-लक्ष्मी महायज्ञ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यात धार्मिक विधी, भजन आणि महाप्रसादामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी ९ वाजता स्वस्तिवाचन, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्यादी ऋत्विक वरण, पीठस्थापना, अग्निस्थापना, हवन आणि पूर्णाहुती असे विविध धार्मिक विधी पार पडले.  श्रीराम मंदिर भक्तीधाम येथे वर्षभर सनातन धर्माशी संबंधित विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये गुरु पुष्य, वर्धापन दिन, अन्नकूट, छप्पन भोग, कृष्ण जन्माष्टमी, नवरात्र उत्सव आणि पंचक्रोशी परिक्रमा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन रामभक्त श्रमदानातून करतात. होम-यज्ञाच्या आहुतीनंतर जनजागृती सोहळ्याअंतर्गत १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर परिसरात भोलेनाथ भजनी मंडळ, नंदगाव यांचा भजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात खुशाल व्यंकट पाटील, मोतीलाल प्रभाकर पाटील, सुभाष तुकाराम पाटील, शिवाजी अधिकार पाटील, सुकलाल पाटील, उत्तम पाटील, हिम्मत उखा पाटील आणि प्रवीण पाटील यांनी सहभाग घेतला. भजनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० भाविकांसाठी महाप्रसाद अर्थात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महंत ईश्वरदास महाराज आणि महंत गोविंददास महाराज यांच्या हस्ते श्रीक्षेत्र श्रीराम मंदिर भक्तीधाम, नंदगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. याबाबतची माहिती पुजारी गोविंददास यांनी दिली.

 

यज्ञासाठी हे होते यजमान 

 

यज्ञासाठी खुशाल व्यंकट पाटील, प्रवीण पाटील, अमोल पाटील, पिंटू पवार, सुभाष पवार, सुभाष पाटील, शरद पाटील, योगेश पाटील, आपा पाटील, विजय पाटील, दिपक पाटील, धिरज पाटील, भाऊडू पाटील, मुरलीधर पाटील, मनोहर पाटील, भिकन पाटील, भुरा पाटील, अप्पा पाटील, ईश्वर पाटील, विक्की पाटील, पिंटू पाटील, डॉ. मुसळे, अशोक शिंदे, गोपाल पाटील, सुकदेव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यजमान म्हणून उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *