अमळनेरमध्ये आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

विविध शासकीय विभागांचे स्टॉल; नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण होणार

 

अमळनेर (प्रतिनिधी) ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत अमळनेर मंडळातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे रोजी नगरपालिका सभागृह, अमळनेर येथे सकाळी १० वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये अमळनेर मंडळातील अमळनेर, मंगरूळ, धार, मालपूर, रंजाणे आणि अंतुर्ली येथील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रलंबित समस्या व तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभाग, नगरपरिषद तसेच इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन व आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या शासकीय कामांबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि अर्ज यावर तातडीने मार्गदर्शन मिळणार आहे. शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *