अमळनेर युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर, तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर नियुक्त

अमळनेर (प्रतिनिधी)  युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी अमळनेर युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर केली आहे. तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, खा. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी यांच्या आदेशाने ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार उन्मेश पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, महिला आघाडी विभागीय प्रमुख सरिता माळी, नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, तालुका प्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहर प्रमुख भरत पवार, विलास कंखरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

युवा कार्यकर्त्यांची निवड झाल्यामुळे नवमतदार पुन्हा एकदा पक्ष व संघटनेसोबत जोडले जातील तसेच तरुण कार्यकर्त्यांची नवी फळी युवासेनेच्या माध्यमातून तयार होईल, असे तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

 

नूतन कार्यकारणी अशी

 

तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर, विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पंकज संतोष शेटे, शहर प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील, उपशहरप्रमुख करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख, तुषार महेंद्र सोनार, शहर संघटक राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटक यश मोहन साळुंखे, कॉलेज कक्ष प्रमुख शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिव गौरव रविंद्र पाटील, सोशल मीडिया प्रमुख पदी खेमचंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र कार्यालयातून प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *