तांदळीत जुन्या भांडणातून चौघांची एकाला बेदम मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी) : मागील भांडणाच्या कारणावरून चौघांनी एकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास तांदळी येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिशांत रामदास पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २६ ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहा वाजता दिशांत हे काकांच्या घरी असताना त्यांना स्वतःच्या घरासमोर गर्दी दिसली. त्यामुळे ते चुलत भाऊ संदीप याला सोबत घेऊन घरी आले. त्यावेळी कुणाल उदयसिंग परदेशी, देवान उदयसिंग परदेशी, आशाबाई उदयसिंग परदेशी आणि उदयसिंग परदेशी हे त्यांच्या आईला शिवीगाळ करीत असल्याचे दिसले. तसेच कुणाल उदयसिंग परदेशी हा त्यांच्या आईला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत दिशांत यांच्या गळ्यातील सोन्याची माळ गहाळ झाली. तसेच कुणाल उदयसिंग परदेशी याने हातातील कड्याने संदीप यांच्या डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी दिशांत रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून कुणाल उदयसिंग परदेशी, देवान उदयसिंग परदेशी, आशाबाई उदयसिंग परदेशी आणि उदयसिंग परदेशी यांच्याविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५, ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *