प्रताप महाविद्यालयाची सायमा तेली राज्यस्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषेच्या पुढील फेरीत दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या एम.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिची महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘कॅम्पस से संसद (अटल ट्रेड, युवा कदम) – सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा – विकसित भारत @२०४७’ या स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित या स्पर्धेत एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून कु. सायमा रज्जाक तेली हिची पुढील फेरीसाठी निवड झाली असून, तिने या फेरीसाठीची ऑनलाइन मुलाखतही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कु. सायमा रज्जाक तेली हिने स्पर्धेची तयारी केली. तसेच ऑनलाइन परीक्षा समन्वयक प्रा. वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी आणि प्रा. ममता महाजन यांच्यासह इतर प्राध्यापकांचेही तिला मार्गदर्शन लाभले. कु. सायमा रज्जाक तेली हिच्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरचे सर्व संचालक व पदाधिकारी तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. मुकेश भोळे, सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम व मार्गदर्शन केंद्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी आणि सहप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनीही कु. सायमा रज्जाक तेली हिचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. डॉ. विवेक बडगुजर, प्रा. डॉ. रामदास सुरडकर, प्रा. अवीत पाटील, प्रा. डॉ. विलास गावीत, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. प्रसाद मुठे, प्रा. हिमांशू गोसावी, प्रा. सुनील सपकाळे, प्रा. उमेश पाटील, प्रा. पडूळ, महाविद्यालयीन अभ्यासक्रम व मार्गदर्शन केंद्रातील सदस्य तसेच दिलीप शिरसाठ यांच्यासह इतर प्राध्यापक आणि कार्यालयीन सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

कार्यालयीन अधिकारी राकेश निळे, भटू चौधरी आणि दुर्योधन नेरकर यांचेही या उपक्रमासाठी विशेष योगदान राहिले. कु. सायमा रज्जाक तेली हिच्या यशामुळे प्रताप महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागासह संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयाच्या वतीने कु. सायमा रज्जाक तेली हिला आगामी फेरीसह भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *