युवासेना–शिवसेना आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतापभाऊ पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त समाजहिताचा उपक्रम; युवकांच्या सेवाभावाचे दर्शन

अमळनेर (प्रतिनिधी ) प्रतापभाऊ गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवासेना–शिवसेना, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या सामाजिक उपक्रमात युवासैनिकांसह समाजाभिमुख विचार जपणाऱ्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. “रक्तदान हेच खरे जीवनदान” या संदेशातून प्रत्येक रक्तदात्याने समाजाप्रती आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.शिबिरादरम्यान युवकांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवला. गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी युवाशक्ती सदैव सज्ज असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर, शहरप्रमुख प्रवीण पाटील तसेच युवासेना पदाधिकारी यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.यापुढेही समाजहिताच्या अशाच विविध उपक्रमांतून गरजूंना मदतीचा हात देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचा आदर्श ठरला असून, अमळनेरमध्ये युवकशक्तीच्या सकारात्मक कार्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *