मारवड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर (BOS) सदस्यपदी निवड

मारवड (प्रतिनिधी): ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील “संरक्षण व सामरिक अभ्यास” विषयाच्या अभ्यास मंडळावर (Board of Studies – BOS) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, संस्थेच्या इतिहासातील ही पहिलीच BOS सदस्यपदाची नियुक्ती असल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक नावलौकिकात निश्चितच भर पडणार असल्याची भावना संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव पाटील यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभारही मानले.

प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास साळुंखे, सचिव मा. आबाजी देविदास पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ. माळी यांच्या या नियुक्तीमुळे संरक्षण व सामरिक अभ्यास विषयाच्या अभ्यासक्रम विकास, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास महाविद्यालय परिवाराने व्यक्त केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *