
मातीचा गणपती घडवत पर्यावरणाचा दिला संदेश; जयनिल फाऊंडेशनच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेरात तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धा; विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक गणेश मूर्ती

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेरतर्फे मराठा मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’ या संदेशाने झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत विविध आकार व कलाकुसरीच्या गणेशमूर्ती साकारल्या. बाल गटात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी, तर दुसऱ्या गटात खुल्या गटातील स्पर्धक सहभागी झाले. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. हा उपक्रम जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरूण राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, सरपंच राजश्री राजेश पाटील, संजय पुनाजी पाटील, चेतन राजपूत, जितू ठाकूर, किरण पाटील, पांडुरंग पाटील, विनोद कदम, राजेश पाटील, महेश पाटील, डॉ. बाविस्कर दांपत्य, गणेश भामरे, भूषण भदाणे, शेलकर सर, दुर्गेश पाटील तसेच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व जयनिल फाऊंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.
आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती
या उपक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संपूर्ण वेळ उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेतील विजेते
बाल गट :
प्रथम क्रमांक — लावण्या काशिनाथ पाटील
द्वितीय क्रमांक — श्रद्धा रविंद कदम
तृतीय क्रमांक — जीविका राजेंद्र पाटील
चौथा क्रमांक — आर्या जितेश पाटील
पाचवा क्रमांक — कृतिका वैभव पवार
खुला गट :
प्रथम क्रमांक — जयेश धनंजय हडप
द्वितीय क्रमांक — हर्षवर्धन महेंद्र वाघ
तृतीय क्रमांक — अनुष्का एकनाथ पाटील
चौथा क्रमांक — कृतिका समाधान पारधी
पाचवा क्रमांक — जानवी रवींद्र पाटील

Leave a Reply