
अमळनेर तालुका व शहर युवासेनेची जंबो कार्यकारणी जाहीर!
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेची युवा आघाडी असलेल्या युवासेनेची अमळनेर तालुका व शहराची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने, पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवासेना प्रमुख पूर्वेश सरनाईक, उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार भुसे, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख निखिल चौधरी यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांच्या संमतीने नियुक्त्या करण्यात आल्या.
शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर आणि उपजिल्हाप्रमुख प्रविण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुका व शहर युवासेनेची नवी कार्यकारणी उभारण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी
विधानसभा क्षेत्र प्रमुख (तालुका) निखिल शेखर महाले-पाटील (अमळगाव) विधानसभा क्षेत्र प्रमुख (शहर) पंकज शेटे उपतालुका प्रमुख मनोज सुरेश पाटील (टाकरखेडा), जयेश रविंद्र चव्हाण (जवखेडा), अधिकार वाल्मिक पाटील (द. सबगव्हाण), मच्छिंद्र केळकर जाधव (वसंतनगर), राहुल साहेबराव पाटील (गळवाडे), प्रविण राजेंद्र चौधरी (कळमसरे), भूषण गोपीचंद कोळी (हिंगोणे प्र. ज.).गटप्रमुख — विपुल शिवाजी पाटील (दहिवद), रणजित राजपुत (खेडी ढोक), सागर चंद्रकांत चौधरी (मांडळ), नरेंद्र चौधरी (अमळगाव), नितीन अनिल पाटील (वाघोदे), भीमराज शिवाजी निकम (जिराळी), प्रफुल्ल अशोक पाटील (मारवड).गणप्रमुख — भूषण पाटील (म्हसले), प्रकाश चिंधा पाटील (एकलहरे), संजय (खली) बळीराम भील (सावखेडा), मनोहर भटू चौधरी (बहादरपूर), समाधान भिकन पारधी (पिंगळवाडे), सचिन विलास पाटील (पाडळसरे).युवासेना अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख रिझवान खान वहाब खान (सारबेटे बु.) शहरप्रमुख शेख अल्ताफ राजा फारुख तीर्थक्षेत्र तालुकाप्रमुख मुकेश चौधरी (अमळगाव) तीर्थक्षेत्र शहरप्रमुख मनिष हरिचंद्र चौधरी कॉलेज कक्ष सचिव गौरव रविंद्र पाटील उपशहरप्रमुख सनी चव्हाण, तुषार महेंद्र सोनार, अमन जाकीर खाटीक शहर संघटक पंकज अरुण चौधरी, अजय कुंदन पवार उपशहर संघटक यश मोहन साळुंखे, मोहित नितीन पाटील यावेळी मार्गदर्शन करताना शिरीषदादा चौधरी यांनी युवासेनेच्या माध्यमातून नवमतदार व युवकांना शिवसेनेसोबत जोडण्याचे आवाहन केले. तसेच युवक व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, शहरप्रमुख भरत पवार, विलास कंखरे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या जंबो कार्यकारणीमुळे अमळनेर तालुका व शहरात युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असून आगामी काळात युवकांच्या प्रश्नांवर युवासेना जोरदार पक्ष वाढवणार आहे असे या नियुक्त्यांमधून मिळत आहेत.

Leave a Reply