जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगणा सहेली अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सुदर्शना पाटील यांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगणा सहेली, अमळनेर या संस्थेची 2026-27 वर्षासाठी नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सुदर्शना पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थापक अध्यक्ष दिपिका सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेचा प्रारंभही सामाजिक कार्यानेच करण्यात आला. युनिक क्लासमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जे. बी. इन्स्टिट्यूटच्या संचालिका मेघा मुंदडा यांनी मुलांना पान-फुलांपासून विविध आकर्षक वस्तू तयार करण्याचे कौशल्य शिकवले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

 

अशी आहे नवीन कार्यकारिणी

 

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अनिता राजेंद्र महाले व विद्या पाटील, सचिवपदी अलका पाटील, तर खजिनदारपदी शोभा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय जयश्री सोनवणे, उज्वला निकुंभ, पुष्पाबाई पाटील, मनीषा पाटील, अलका बोडरे व भारती शिंदे यांची संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नीलिमा माहेश्वरी व अपेक्षा पवार यांचीही विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *