
अमळनेरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने आता दर रविवारी बंद राहणार
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सर्व बिल्डिंग मटेरियल विक्रेत्या व्यापाऱ्यांची नुकतीच पाठक ट्रेडर्स धुळे रोड येथे बैठक झाली. यामध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा विनिमय करण्यात आली. तसेच सर्व दुकानदारांनी एकाच भावात सिमेंटची विक्री करावी. तसेच दर रविवारी बिल्डिंग मटेरियल विक्रीचे सर्व दुकाने दर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व बिल्डिंग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांची एकजूट होऊन अमळनेर शहर बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाठक (पाठक ट्रेडर्स) उपाध्यक्षपदी रोहन वाडीले (आर. आर. स्टील ) सेक्रेटरीपदी हिरामण देवासी (आंबे स्टील) तर खजिनदारपदी संतोष पटेल( महादेव ट्रेडर्स) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर असोसिएशनच्या माध्यमातून काही नियमावली तयार करण्यात आली. यात सर्वात महत्त्वाचे नियम म्हणजे सर्व दुकानदारांनी एकाच भावात सिमेंटची विक्री करावी. तसेच दर रविवारी बिल्डिंग मटेरियल विक्रीचे सर्व दुकाने दर रविवारी पूर्णपणे बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply