
टाकाऊ वस्तूंपासून साकारले आकर्षक आकाशकंदील; साने गुरुजी कन्या विद्यालयातील उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीच्या पारंपरिक सजावटीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत साने गुरुजी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थिनींच्या कल्पकतेला सर्जनशीलतेची जोड देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील आणि सचिव संदीप घोरपडे यांनी कौतुक केले.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कलात्मकता विकसित व्हावी, या उद्देशाने विद्यालयात आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी टाकाऊ तसेच उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून विविध आकर्षक आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कंदिलांची माहिती विस्तार अधिकारी प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी जाणून घेतली. विद्यार्थिनींच्या कल्पकतेतून साकारलेल्या सुंदर कलाकृतींचे निरीक्षण करून विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, स्वावलंबन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक डी.ए.धनगर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जे.एस.पाटील, दिलीप पाटील, मनीषा वैद्य, आर.एम.देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन, धनश्री वानखेडे, मोनाली वंजारी, धनश्री साळुंखे तसेच विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी तयार केलेले आकर्षक आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

Leave a Reply