अमळनेर जेडीसीसी बँक शाखेविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन; ग्राहक सुविधांसाठी निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मार्केट परिसरातील जेडीसीसी बँक शाखेमध्ये ग्राहकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनाला निवेदन देत आंदोलन केले. या वेळी बँकेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉ. प्रकाश सोनवणे, प्रा. सुरेश विक्रम पाटील, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ वना पाटील, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल जाधव, तालुका सरचिटणीस राजू भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनासमोर ग्राहकांच्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. बँकेत पंख्यांची व्यवस्था, ग्राहकांना बसण्यासाठी नवीन बाकडे, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच कर्मचाऱ्यांचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी नोटा मोजणी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत “बँक आमच्या हक्काची आहे, कोणाच्या बापाची नाही” अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाला उपस्थित शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *