वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने ४५ महिलांना सप्तशृंगीचे घडवले दर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गंगापुरी येथील वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने ४५ महिलांना सप्तशृंगीचे दर्शन घडवले

तालुक्यातील गंगापुरी येथील भीमराव किसन रामोसे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते दीर्घकाळ अंथरुणाला खिळले होते. त्यांनी मुलगा, पत्रकार तथा शिक्षक महेंद्र रामोसे यांच्याकडे सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गडावर नेण्याचे महेंद्र रामोसे यांनी ठरवले होते; मात्र त्यापूर्वीच भीमराव रामोसे यांचे निधन झाले.

वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करू शकलो नाही म्हणून त्यांनी आपल्या आईसोबत गावातील ४५ महिलांना स्वखर्चाने सप्तशृंगी गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले. वडिलांना प्रत्यक्ष नेऊ शकलो नाही, पण त्यांच्या इच्छेप्रमाणे इतरांना दर्शन घडवून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *