पाडळसरे येथे आज मरीआईची यात्रोत्सव, ग्रामस्थांमध्ये उत्साह

लोकमनोरंजनासाठी लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम रंगणार

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी मरिआईचा यात्रोत्सव उत्साह होणार आहे. यासाठी ग्रामस्थांकडून यात्रेची तयारी करण्यात आली आहे.

पाडळसरे येथील मरिआईची यात्रेस अनेक वर्षांची परंपरा आहे. येथील माजी उपसरपंच भिला साळुंखे ये गावातील ग्रामस्थांच्या मदतीने ही यात्रा भरावयास सुरुवात केली आहे. काही वर्षांपासून पाडळसरे या गावाचे नवीन पूनर्वसन समायोजन झाले आहे. तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर व गावात असलेलं मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी होत असते, हे विशेष. गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या या, यात्रोत्सवात गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात. गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी शांताराम चव्हाण दहिवदकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे.  दरम्यान मंगळवारी होणाऱ्या यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणी दुकाने, संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी आपली दुकाने थाटावी. तसेच यात्रा काळात शांतता राखावी, असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *