साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभ निमित्त वकृत्व स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये श्री गुरु तेग बहादूर शहिदी समारंभ निमित्ताने मंगळावर दि. १७ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतसाद मिळाला.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. दिलीप पाटील, आर.एम.देशमुख, साळुंखे सर, मुकेश पाटील, दीपक महाजन व वंजारी मॅडम उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या कार्याचा व साहित्याचा परिचय आपल्या भाषणात करून दिला. या स्पर्धेत रेणुका लाड (९ वी ब) प्रथम, भूमिका पाटील (९ वी अ) द्वितीय, उर्वशी महाजन (८ वी ब) तृतीय व आदिती पाटील ८ वी अ उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले. शिक्षकांमधून देशमुख सर, मुकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जे. एस. पाटील यांनी श्री गुरुतेग बहादुर साहिब यांच्या देशभक्तीचा व त्यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. त्यांना” हिंद दी चादर” हा किताब का दिला याच्या विषयी सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले. आभार दीपक महाजन यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *