चांदणी कुऱ्हे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथे एका ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पंकज भगवान पाटील (वय ३३) यांनी ३ मे रोजी पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरात छतावरील लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेंद्र देशमाने करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *