
सारबेटे खुर्दमध्ये शेतातील साहित्यावर चोरट्यांचा डल्ला; २० हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे सारबेटे खुर्द येथील शेतकरी विजय लुकडू पाटील यांच्या सारबेटे शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाण्याची मोटर, वायर तसेच इतर शेती उपयोगी साहित्य असा अंदाजे २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली. सकाळी शेतात गेल्यानंतर शेतकऱ्याच्या निदर्शनास चोरी झाल्याचे आले. त्यानंतर याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमाने करीत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply