
पाइपलाईनसाठी दोन्ही बाजूला दोन दोन फूट जागा सोडण्याचा निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी) ऐन पाईपलाईनचे काम सुरू होताना रस्ता ठेकेदाराने काम सुरू केल्याने रस्त्याचे आणि आर्थिक नुकसान होणार होते. म्हणून अखेर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मध्यस्थीने तोडगा काढून पाईपलाईनसाठी दोन्ही बाजूला दोन दोन फूट जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
ढेकू रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचा कार्यारंभ आदेश दोन वर्षांपूर्वी देण्यात आला होता. मुदत संपूनही ठेकेदार काम करत नव्हता. त्याच प्रमाणे नगरपरिषदेची २४ बाय ७ योजनेच्या तीन पाईप लाईन या रस्त्याने जाणार आहेत. त्यासाठी रस्ता खोदावा लागणार आहे. मात्र पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यात समन्वय नसल्याने ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. पाईप लाईनच्या कामासाठी किमान चार पाच महिने लागणार आहेत. रस्त्याचे काम झाले तर पुन्हा रस्ता खोदावा लागून त्याची रक्कम पालिकेला भरावी लागली असती. त्यामुळे रस्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून माजी आमदार चौधरी, नगराध्यक्ष बाविस्कर, उपनगराध्यक्ष निकम, पाणी पूरवठा सभापती पाटील, महेश देशमुख, नावेद शेख , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रमोद पाटील, अभियंता भागवत माळी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात मार्ग काढण्यात आला.

Leave a Reply