अमळनेर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या; संघटनात्मक बळकटीवर भर

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मोठी चालना मिळणार आहे.

या नियुक्त्यांमागे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी निर्णायक ठरली आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार शिरीष दादा चौधरी, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव भाऊ पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, महिला आघाडी विभागीय अध्यक्ष सरीताताई माळी, आमदार किशोर पाटील, अमोल  पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश आहे. शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे  यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नूतन कार्यकारिणी आशी

 

अमळनेर तालुका प्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, शहर अध्यक्ष विलास सुकदेव कंखरे (१०/१८), भरत प्रकाश पवार (१/९), विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश अर्जुन पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश मधुकर पवार (कार्यक्षेत्र – अमळनेर विधानसभा).

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *