स्व.पारसमल चोपडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमळनेर गौशाळेला औषधांची देणगी

अमळनेर (प्रतिनिधी) श्रीमती चंदनबाला पारसमल चोपडा, धनश्री मेडिकल आणि नमो मेडिकल यांच्या वतीने स्व. पारसमल चोपडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमळनेर गौशाळेतील आश्रित मुक्या जनावरांच्या आरोग्यासाठी विविध प्रकारची औषधे देणगी स्वरूपात देण्यात आली.

गेल्या सहा वर्षांपासून चोपडा परिवारातर्फे स्व. पारसमल चोपडा यांच्या स्मृतिदिनी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या निस्पृह सामाजिक कार्याबद्दल गौशाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण कोचर यांनी चोपडा परिवाराचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी श्रीमती चंदनबाला चोपडा, सचिन चोपडा, सौ. सृष्टी चोपडा, रोटरी क्लबचे पदाधिकारी रोहित सिंघवी, देवेंद्र कोठारी, वृषभ पारख, महेश पाटील, किरण कुंभार, निलेश पाटील, प्रा. डॉ. अरुण कोचर तसेच गौशाळेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम पाटील आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *