
दोन रुपयांत जिल्हा बँकेचा ठराव! वावडे गावाने केला सहकारात अनोखा विक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील वावडे गावाने सहकार क्षेत्रात साधेपणाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. वावडे येथील मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नगरसेविका गायत्री दिपक पाटील यांच्या नावाचा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचा ठराव सर्व संचालक मंडळाच्या एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या ठरावासाठी आवश्यक असलेल्या झेरॉक्स प्रतींसाठी अवघा दोन रुपयांचा खर्च आला. कोणताही अनावश्यक खर्च न करता अत्यंत साधेपणाने ठराव मंजूर झाल्याने या निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरू आहे.
वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक मणिलाल पाटील यांच्या पत्नी गायत्री दिपक पाटील यांच्या नावाचा हा ठराव संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. एकमताने झालेल्या या ठरावातून संचालक मंडळाने गायत्री दिपक पाटील यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नुकताच दिपक मणिलाल पाटील यांच्या नावाचा शेतकी संघासाठीही ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पाटील दाम्पत्याच्या नावांचा सहकार क्षेत्रातील विविध संस्थांसाठी ठराव मंजूर झाल्याने सहकार क्षेत्रात त्यांच्या कार्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दिपक मणिलाल पाटील हे सध्या वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. दिपक मणिलाल पाटील हे सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य आणि गावाच्या विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेत आहेत. गावाच्या विविध प्रश्नांमध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये मागील पंचवार्षिक काळात गायत्री दिपक पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या माध्यमातून प्रभागात विविध विकासात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नावाचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ठराव एकमताने मंजूर होणे हा त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचा भाग असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे जिल्हा बँकेसाठीचा ठराव मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी केवळ दोन रुपये खर्च आला. सहकार क्षेत्रातील ठरावांसाठी मोठा खर्च होतो, अशी सर्वसाधारण धारणा असताना वावडे गावात अत्यंत साधेपणाने आणि अल्प खर्चात हा ठराव मंजूर झाल्याने हा प्रकार तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
या ठरावासाठी सहकार्य करणाऱ्या वावडे मारुती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाचे तसेच वावडे ग्रामस्थांचे दिपक मणिलाल पाटील आणि गायत्री दिपक पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply