जी. एस. हायस्कूलमध्ये तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सी. एस. सोनजे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, मुख्य लिपीक जयश्री भालेराव, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत काटकर, शिक्षकेतर प्रतिनिधी व्ही. जी. महाले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक के. आर. बाविस्कर, जे. व्ही. बाविस्कर आणि के. डी. साळुंखे यांनी सहकार्य केले. ध्वजारोहणानंतर एस. ए. बनछोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून तिरंगा चौकापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढली. देशभक्तीपर घोषणा आणि हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमुळे परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत स्वातंत्र्य दिनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *