अमळनेर शिवसेनेकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेनेच्या वतीने आबासाहेब एस. एस. पाटील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

खाऊ वाटपाचा कार्यक्रम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन निळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्याशी संवाद साधून शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब पवार, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मनिषा परब, महिला आघाडीच्या शहरप्रमुख उज्ज्वला कदम, माजी उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, शहर संघटक मोहन भोई, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पाटील, रवींद्र पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोकुळ कोळी, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, निबा पाटील, शाखाप्रमुख मुश्ताक बागवान, विमल बाफना, विशाल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच अशा उपक्रमांचे खरे समाधान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *