अमळनेर (प्रतिनिधी) बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून अमळनेर तालुक्याने यंदाही उत्तम कामगिरी करत ९६.३६ टक्के निकालाची नोंद केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून बसलेल्या ३,३०५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३,१७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीचा ९५.८३ टक्के निकाल ओलांडत यंदा ०.८ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

यंदाच्या निकालात आठ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल लावून विशेष कामगिरी केली आहे. यात प्रताप महाविद्यालय (कला विभाग), श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा, बी.बी. ठाकरे ज्युनिअर कॉलेज वावडे, शिवाजी हायस्कूल अमळनेर, अल फाईज उर्दू गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, यशवंत आदिवासी आश्रमशाळा पिंपळे (विज्ञान), एन.टी. मुंदडा ज्युनिअर कॉलेज (विज्ञान) आणि कै. बी.आर. पाटील ज्युनिअर कॉलेज मारवड यांचा समावेश आहे.

इतर महाविद्यालयांचाही निकाल उल्लेखनीय राहिला आहे. प्रताप कॉलेज (विज्ञान) ९९.७८% आणि कॉमर्स ९७.४६% निकालासह आघाडीवर आहे. जय योगेश्वर विद्यालयाने ९९.०६% तर विजय नाना पाटील आर्मी स्कूलने ९८.७८% निकाल नोंदवला. गुरुकुल इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज (९७.१४%), साई ज्युनिअर कॉलेज (९६.५५%) आणि आदर्श हायस्कूल मांडळ (९६.८७%) यांनीही चांगली कामगिरी केली.

तर काही शाळांचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे. नवभारत उच्च माध्यमिक विद्यालय दहिवद (६१.११%), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव-गडखांब (६६.६६%) आणि किसान माध्यमिक विद्यालय जानवे (३७.५०%) यांचा निकाल कमी टक्केवारीत लागला आहे.

विज्ञान शाखेत काही महाविद्यालयांचा ९९% पेक्षा जास्त निकाल एकूणच, अमळनेर तालुक्याने यंदाच्या बारावी परीक्षेत सातत्यपूर्ण प्रगती राखत दर्जेदार निकाल नोंदवला असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश मिळाल्याचे दिसून येते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *