जागतिक योग दिनानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त रविवार, दि. 21 जून रोजी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष योग शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री मंगळग्रह मंदिर येथे सकाळी 7 ते 10 या वेळेत योग शिबिर पार पडणार असून या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याबरोबरच नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. योग शिबिरामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, तणावमुक्ती, प्राणायाम आणि ध्यान याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. योगाच्या नियमित सरावामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास कशी मदत होते, याबाबतही उपस्थितांना माहिती दिली जाणार आहे.

तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रतपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा विशेष लाभ गरजू व ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. या दोन्ही शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले तसेच समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *