
अमळनेरच्या शांतनु भावसार यांची यिन मिनिस्ट्री २०२६ मध्ये उपसभापतीपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयातील एसवायबीसीएचा विद्यार्थी शांतनु शामकांत भावसार यांची सकाळ मीडिया ग्रुप आयोजित यिन मिनिस्ट्री २०२६ मध्ये उपसभापतीपदी निवड झाली आहे. ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून अमळनेर व उत्तर महाराष्ट्रातील युवकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३० व ३१ मार्च रोजी झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमधून यिन प्रति आमदार सहभागी झाले होते. अमळनेर मतदारसंघातून शांतनु भावसार यांनी उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. मंत्रीमंडळ निवड प्रक्रियेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकाची मते मिळाली. उपसभापती म्हणून त्यांनी तब्बल ९ तास सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने चालवले. तसेच मुंबई येथील विधान भवन येथे अभ्यास दौरा करून विविध मंत्र्यांशी संवाद साधला. त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर शहरात आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply