मांडळ येथील दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक; मारवड पोलिसांची कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणात मारवड पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पांडुरंग बुधा भील (रा. मांडळ) यांच्या मालकीची बजाज डिस्कवर ही दुचाकी दि. २३ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेनंतर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी वाल्मीक त्र्यंबक माळी आणि पिंटू पारधी (दोघेही रा. चाळीसगाव) यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून वाल्मीक माळी याला अटक करण्यात यश मिळवले आहे.

दरम्यान, दुसरा संशयित पिंटू पारधी याचा शोध सुरू असून, चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, लवकरच संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *