टाकरखेडा रस्त्यावर गुरांची निर्दयी वाहतूक प्रकरणी शिरपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर एका वाहनातून गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शिरपूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २१ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर संशयित वाहन (एमएच १८ बीझेड ४२३४) तपासणीदरम्यान थांबवण्यात आले असता त्यामध्ये सुमारे २५ हजार रुपये किमतीची ३ जनावरे अत्यंत गैरसोयीच्या व निर्दयी पद्धतीने वाहतूक करताना आढळून आली.

या प्रकरणी जाबीर शेख मेहमूद शेख (वय ३४) व दानिश शेख कलीम शेख (वय २३, दोघे रा. गणेश कॉलनी, शिरपूर) यांच्याकडे गुरांच्या वाहतुकीसाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. तसेच प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत संबंधित दोघांविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेसंबंधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील जाधव करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *