
हितांश पाटीलचा दुहेरी पराक्रम; सैनिकी शाळेत निवड, नवोदयमध्ये जिल्ह्यात प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी )येथील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने उल्लेखनीय यश संपादन करत दुहेरी पराक्रम गाजवला आहे. सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेत ३०० पैकी २३५ गुण मिळवत त्याची निवड झाली असून, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक (Rank 1) मिळवत त्याने गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे.
इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या हितांशने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तो अत्यंत अभ्यासू, मेहनती व जिज्ञासू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. शालेय जीवनातही त्याने शैक्षणिक तसेच विविध उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडी घेतली आहे.
हितांशच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या दुहेरी यशामुळे शाळा व कुटुंबाचा गौरव वाढला असून, परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply