
38 वर्षीय शेतमजूर महिलेची गळफास लावून आत्महत्या
अमळनेर(प्रतिनिधी )तालुक्यातील गलवाडे बुद्रुक शिवारात ३८ वर्षीय शेतमजूर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 21 रोजी दुपारी उघडकीस आली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील अनिता मांगीलाल पावरा (वय 38) ही आपल्या कुटुंबीयासहीत गलवाडे बुद्रुक येथील प्रवीण साहेबराव मिस्त्री यांचे शेतात सालदारकी करत होती. २१ रोजी दुपारी चार वाजता तिने शेतातच निंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. यावेळी उपस्थितांनी साडी कापून तिला खाली उतरवत अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply