प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन; विविध वीज योजनांची माहिती उपलब्ध

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे ‘प्रगतिशील महाराष्ट्र-२०२६’ प्रदर्शन अमळनेर येथील कलागुरू मंगल भवन येथे बुधवारी (दि. ७) सुरू झाले. प्रदर्शनातील महावितरणच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार नंदकुमार महाजन आणि आमदार अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणच्या दालनात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना तसेच स्मार्ट मीटरच्या फायद्यांची माहिती देण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केले.

जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी आणि अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे दालन उभारण्यात आले आहे. यावेळी सांघिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थूल, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, जळगाव परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, अमळनेरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहायक अभियंता हितेंद्र बढे, मनोज वाडिले, विनायक बोरसे, हेमंत सैदाणे, नितीन ठवकर, मोहन नेवाळे, भाऊसाहेब महाजन, तंत्रज्ञ दीपक अहिरे आणि सुषमा हजारे यांनी ग्राहकांना विविध योजनांची माहिती दिली. दालनात विद्युत सुरक्षा आणि वीजबचतीबाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. ग्राहकांच्या तक्रारींसाठी दालनात स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली असून प्राप्त तक्रारींवर कार्यवाही केली जात आहे.

‘प्रगतिशील महाराष्ट्र-२०२६’ प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत खुले राहणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन महावितरणच्या दालनातील विविध योजनांची माहिती घ्यावी आणि पात्र योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *