चिमणपुरी पिंपळे विकासोच्या चेअरमनपदी विजय पाटील, उपाध्यक्षपदी निंबा चौधरी यांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) चिमणपुरी पिंपळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विजय साहेबराव पाटील तर उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन)पदी निंबा दयाराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल गावातील मान्यवर, संचालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून सत्कार केला.

यावेळी संचालक युवराज श्यामराव पाटील, गुलाब नाना पाटील, महेंद्र गट्टा पाटील, सुमनबाई रमेश चौधरी, प्रमिलाबाई आधार पाटील, राजेंद्र सीताराम पाटील, पंडित विक्रम पाटील, दिलीप आनंदा पाटील, सुधाकर भिका लांडगे आणि नवल गोदा सैदाणे उपस्थित होते. तसेच माजी शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, निंबा दला चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, जयवंतराव पाटील तसेच ग्रामस्थ व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन व उपाध्यक्षांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी महाजन यांनी कामकाज पाहिले, तर सोसायटीचे सचिव रवींद्र पाटील यांनी निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. नव्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकरी व सभासदांच्या हितासाठी विकासाभिमुख कामकाज होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *