जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी वसुंधरा लांडगे यांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, जळगाव येथे विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेरच्या सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडीच्या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष हेमंत चौधरी, तसेच संजय बिर्ला, सतीश मदाने, आरती हुजुरबाजार, शांता वाणी, ॲड. रविंद्र पाचपोहे, सुरेश झोपे, डॉ. नरेंद्र शिरसाठ, ए. टी. महाजन, प्रशांत अग्रवाल आणि देविदास पाटील उपस्थित होते. वसुंधरा दशरथ लांडगे यांच्या निवडीबद्दल अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारीवृंद, तसेच खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळ, पत्रकार संघटना अमळनेर, अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि पूज्य सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *