अमळनेरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी, चोपडा रोड, मंगलग्रह मंदिराजवळ, अमळनेर येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

अमळनेर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय विभाग (इयत्ता आठवी), कनिष्ठ महाविद्यालय विभाग (इयत्ता अकरावी), वरिष्ठ महाविद्यालयीन विभाग तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिला जाणार आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत दूध, नाश्ता, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, संगणक, वाय-फाय सुविधा तसेच इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर त्याची छापील प्रत आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावी, असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक निखिल महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *