अमळनेरात १७ जूनला महाराणा प्रताप जयंती उत्सव; राजपूत एकता मंचची नियोजन बैठक उत्साहात

समितीची स्थापना; रणजित पाटील व नितीन राजपूत यांचा विशेष सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) राजपूत समाजाचे आराध्य दैवत महाराणा प्रताप यांची जयंती यंदा १७ जून रोजी राजपूत एकता मंचच्या वतीने अमळनेर येथे उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी समाज बांधवांची बैठक ५ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, कार्यक्रमांची रूपरेषा तसेच विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उत्सव भव्य आणि यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून त्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या माध्यमातून जयंती उत्सवाचे सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी समाजातील ज्येष्ठ व मान्यवरांच्या हस्ते राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित भीमसिंह पाटील (खोखरपाट) यांचा अमळनेर तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नितीन इंद्रसिंग राजपूत (खोखरपाट) यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित समाज बांधवांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाच्या प्रगतीसाठी तसेच सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले. बैठकीस समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा महाराणा प्रताप जयंती उत्सव अधिक भव्य, प्रेरणादायी आणि संस्मरणीय करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *