अमळनेरात संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडाऱ्यासह भक्तिमय वातावरणात उत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) येथे संत शिरोमणी भिमा भोई जयंती भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करण्यात आली.

भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत भक्तीभावाने जयंती उत्सव साजरा केला. यावेळी सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे व भाऊसाहेब महाजन यांचा भोई समाजाच्या वतीने मोलाचे योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे व प्रवीण शिंगाणे यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला असून समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *