
आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा जनजागृती उपक्रमासाठी सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांना जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रभावी जनजागृती केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
योगेश कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन तसेच राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती मोहीम राबवून हिवताप व डेंग्यू प्रतिबंधाबाबत प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत गटविकास अधिकारी एन. एस. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी तसेच तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. हिवताप दिन व राष्ट्रीय डेंग्यू दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे, आरोग्य सहाय्यक किशोर माळी, संजीव पाटील व तुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले. मारवड ग्रामपंचायत स्तरावर सरपंच भिकन पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहिल चौधरी, विद्या देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे, आरोग्य सहायिका सुनिता गावित, औषध निर्माण अधिकारी विलास बिऱ्हाडे, आरोग्य सेविका ललिता तिडके, सरला परदेशी, हिरामण मेठे तसेच आशा सेविका संगीता चौधरी, राजश्री पाटील, मनीषा पाटील, मंदाताई शिंदे, कल्याणी पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply