
८७७ नामांकनांतून ४१ गुणवंतांचा ‘समाजरत्न व समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) वाणी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ गुणवंत समाजबांधवांचा ‘समाजरत्न व समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील संपूर्ण वाणी समाजातून प्राप्त झालेल्या ८७७ मान्यवरांच्या नामांकनांमधून निवड समितीने ४१ मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड केली. या माध्यमातून समाजासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री नाथाभाऊ खडसे, शिरोरे प्रतिष्ठान खामखेडाचे अध्यक्ष महेश शिरोरे, आशापुरी देवस्थानचे अध्यक्ष विजय पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याप्रसंगी अमळनेर येथून बाळासाहेब नेरकर, दिनकर नागदकर, विजय मराठे, सुनील कोठावदे, शैलेश मोराणकर, गोटू बाविस्कर, चिंतामण वाणी आदी समाजबांधवांनी उपस्थिती लावली. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याच्या या उपक्रमाचे समाजबांधवांकडून कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे गुणवंतांच्या कार्याला प्रोत्साहन मिळण्यासोबतच समाजातील एकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply