
जवखेडा येथे वृद्ध महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे ७५ वर्षीय वृद्ध महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मंडाबाई बाबुराव माळी असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंडाबाई बाबुराव माळी या जवखेडा येथे आपल्या राहत्या घरी होत्या. यावेळी त्यांनी घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच त्यांचा पुतण्या आणि गावाचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वृद्ध महिलेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

Leave a Reply